भारतीयांच्या जीवनशैलीत कितीही बदल झाला असला तरी आपली भारतीय खाद्य संस्कृती मात्र अजूनही कायम आहे.
आपल्या खाद्य संस्कृतीचे (Cooking style) जतन होत आहे ही खूप चांगली बाब आहे पण त्यामुळे भारतीय बायकांची स्वयंपाक घरातून (Kitchen मधून) काही सुटका नाही हे तितकेच खरे आहे
त्यामुळे आपल्या वेळेचे नियोजन करताना (Time Management) स्वयंपाक घराचं योग्य आयोजन करणे Kitchen Management हे अत्यंत अत्यावश्यक आहे जेणेकरून स्वयंपाक करणे सोपे आणि स्ट्रेस फ्री होईल. आणि स्वयंपाकघरातील वेळ वाचवून तुम्हाला इतर ऍक्टिव्हिटीज साठी फ्री वेळ मिळेल.
स्वयंपाकघर ‘मॅनेजमेंट’ मध्ये दो भाग येतात:
१) स्वयंपाकाची पूर्वतयारी Meal Planning
२) स्वयंपाकघर नीटनेटके, व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवणे (Kitchen Organization).
या दोन गोष्टी तुम्ही ‘क्रॅक’ केल्या तर तुम्ही ‘इफेक्टिवली’ कोणताही ताण न घेता कुकिंग करू शकाल.
Image Credit: cozyhaventales
आजच्या या लेखात ‘मी’ स्वयंपाकघर कसे ‘ऑर्गनाईज’ करावे याबद्दल काही टिप्स शेयर करणार आहे. How to organize Your Kitchen?
तुमच्या स्वयंपाकघराचं आयोजन आणि देखभाल करण्यासाठी टिप्स
आपल्या भारतीय स्वयंपाकघरात Indian Cooking आपण अनेक गोष्टी अगदी ‘स्क्रॅच’ पासून बनवतो, अर्थातच त्यामुळे आपल्या स्वयंपाकाला बऱ्यापैकी वेळ लागत असतो.
दिवसातून तीन वेळा काय स्वयंपाक करायचा हे ठरवणे, तो स्वयंपाक करणे किंवा करून घेणे हे वाटते तितके सोपे नाही. पण ज्या गोष्टी कराव्या लागणार त्या कराव्या लागणारच आहेत. त्याला पर्याय नाही! परंतु काही साध्या सवयी आत्मसात करून तुम्ही रोजच्या स्वयंपाकाला एका आनंददायक अनुभवात नक्कीच बदलू शकता
तर, सुरूवात करूया!
(1) डिक्लटरिंग Decluttering:
सर्वात प्रथम कधी न वापरले जाणारे घरातील सर्वसामान काढून टाका.
बऱ्याच वेळा आपण पुढे कधीतरी लागेल म्हणून उगाचच खूप वस्तू सांभाळून ठेवतो; बऱ्याच वेळेस असे काही आपण ठेवले आहे हेही आपल्या लक्षात नसते किंवा ते पडून पडून इतके जुने होते की वापरण्यालायक रहात सुद्धा नाही.
तुम्ही अशा सर्व वस्तू मन मोठे करून किंवा मन घट्ट करून घरातून काढून टाका.
कधीच न वापरले गेलेले-झाकण नसलेले डबे, जुने हंडे, पातेली, प्लास्टिकच्या किंवा दुधाच्या पिशव्या, जुनी व न लागणारी औषधे, एक्सपायरी झालेले सॉस-मसाले असे सर्व तुम्ही एकत्र एका ठिकाणी गोळा करा.
आता तुम्हाला या सर्व वस्तूंची तीन भागात विभागणी करायची आहे. त्याकरिता तुम्ही तीन बॉक्सेस किंवा तीन पिशव्या किंवा तीन बादल्या घेऊ शकता. त्यांना आपण रिसायकल, डोनेट आणि डिस्काrd अशी नावे देऊ. ज्या वस्तू तुम्हाला पुढे जाऊन खरच लागणार आहेत किंवा तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करणार आहात. त्या वस्तूंना तुम्ही रिसायकल किंवा रिपर्पज बॉक्समध्ये टाका ज्या वस्तू सुस्थितीत आहेत पण तुम्ही कधी वापरण्याची शक्यता नाही अशा वस्तूंना डोनेट बॉक्स मध्ये टाका आणि वापरण्यालायक नसलेल्या किंवा एक्सपायरी झालेल्या सर्व वस्तूंना डिस्काउंट बॉक्समध्ये टाका.
आणि लक्षात ठेवा डोनेट आणि डिस्काउंट मधील सामान परत उलटे काढून घेऊ नका. मिनिमलिस्टिक किचन हे स्वच्छ आणि व्यवस्थित किचन असते . पण पुढे कधीतरी लागेल म्हणून ठेवले या स्वभावात बदल करणे फार आवश्यक आहे
(2) किचन ट्रायएंगल Kitchen Triangle:
किचन ट्रायएंगल ही एक डिझाइन संकल्पना आहे.
ह्या संकल्पनेचा मुख्य उद्देश म्हणजे स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या घटकांना घटकांना जसे गॅस फ्रीज आणि सिंग यांना एकमेकांजवळ ठेवणे – ज्यामुळे अनावश्यक चालणे कमी होते आणि काम पटापट होते.
शक्यतो, या तीनही गोष्टी एकमेकांपासून पाच सहा पाच-सहा पावलांपेक्षा जास्त लांब नसाव्या.
(3) स्वयंपाकघराचे झोन ठरवा:
स्वयंपाक घराचे डिझाईन प्लॅन करताना किंवा एक्झिस्टिंग डिझाईन मध्ये अरेंजमेंट चेंज करताना त्यात झोन बनवायचा प्रयत्न करा. फार नाही पण बेसिक तीन झोन तुम्ही तयार करू शकता.
- ऍक्च्युअल स्वयंपाक
- स्वयंपाकाची पूर्वतयारी झोन
- स्टोरेज
असे बेसिक तीन झोन तयार करा.
तुम्ही बेकिंग करत असाल तर त्यासाठी एक स्वतंत्र झोन केला जाऊ शकतो पण रोज बेकिंग करत नसाल तर सेपरेट झोन करण्याची आवश्यकता नाही.
झोन डिसाईड केल्यानंतर महत्त्वाचे काम म्हणजे स्वतःला शिस्त लावून घ्या! त्या त्या झोन रिलेटेड सर्व वस्तू तेथेच ठेवायला ठेवल्या गेल्या पाहिजेत आणि त्या रिलेटेड काम हे त्या ठिकाणी किंवा त्या झोन मध्येच झाले पाहिजे.
चॉपिंग बोर्ड, चालनी, खलबत्ता, मिक्सर यांसारख्या वस्तू स्वयंपाकाची पूर्वतयारी झोन मध्ये एकत्र ठेवा.
(4) सामान गटबद्ध करा:
सामानाचे वर्गीकरण करा व वस्तू गटबद्ध करा. (वस्तू आणि सामानाचे ग्रुप्स बनवा).
- कोरडे मसाले आणि डाळी: ड्राय स्पायसेस आणि डाळींचा साठा एकत्र ठेवा.
- कॉफी किंवा चहा स्टेशन तयार करा ज्यात कॉफी, साखर, कप आणि फिल्टर्स एकत्रित ठेवलेले असतील.
- पाककृतीसाठी आवश्यक वस्तू: दाण्याचं कुट, किसलेले खोबरं, चिरलेला गूळ, तूप यांसारख्या वस्तू एका ठिकाणी आणि शक्यतो उजव्या हाताशी ठेवा
- ग्लासवेअर: सिंक किंवा फ्रिजच्या जवळ ठेवा.
(5) पारदर्शक कंटेनर्स :
वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी व व्यवस्थित दिसण्यासाठी पारदर्शक कंटेनर्स चा वापर करा.
यातून वस्तू पटकन दिसतात व पदार्थ डोळ्यांना दिसले की कोणता पदार्थ बनवायचा हे ठरवणे सोपे जाते.
पारदर्शक डब्यात ठेवलेले कलरफुल इन्ग्रेडियंट जसे डाळी, दाणे, कडधान्य, मसाले हेच तुमच्या किचनमध्ये डेकोरेटिव्ह ॲक्सेसरीचे काम करतील.
स्टेनलेस स्टील कंटेनर्स असतील तर तुम्ही त्याला बाहेरून स्टिकर्स लावू शकता पारदर्शक बरण्यांना सुद्धा एकसारखे स्टिकर्स लावल्यास खूप आकर्षक दिसते.
अशा अनेक प्रकारच्या सुंदर बाटल्या व स्टीकर्स तुम्हाला ॲमेझॉन वर सहज उपलब्ध होऊ शकतात.
(6) कंटेनर्स आणि लिड्स एकत्र ठेवा:
एका मोठ्या कंटेनरमध्ये किंवा बास्केटमध्ये सर्व प्रकारचे रिकामे कंटेनर्स, डबे आणि त्यांची झाकणे एकत्र ठेवा.
पॉट्स आणि पॅनसाठी देखील याचप्रकारे व्यवस्था करा. पॉट्स आणि पॅनसाठी अशा प्रकारचे ऑर्गनायझर्स तुम्ही वापरू शकता.
(7) व्हर्टिकल जागेचा (उंचीचा) वापर करा:
जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे वर्टीकल स्पेस् म्हणजे उंचीचा पुरेपूर वापर करा.
- कपाटात अशा प्रकारचे एस एस चे शेल्फस ठेवून व्हर्टिकल स्पेस वापरू शकता.
- ओव्हर हेड कपाटांच्या खाली हुक्स लावून त्याला कप लटकवू शकता.
- कपाटाच्या खाली ग्लास किंवा रेडिमेड शेल्फ लावून तेथे चहा-कॉफीच्या एकसारख्या बरण्या ठेवू शकता.
- किचन डोअरच्या आत हुक्स लावून मोजमाप कप, ओव्हन मिट्स, जास्तीचे चमचे टांगू शकता.
(8) लेझी सुसन्सचा वापर करा:
स्वयंपाक घरात रोटेटिंग ट्रेचा वापर जरूर करा. हे वापरायला सोईस्कर असतात व दिसायलाही छान दिसतात.
यावर लोणची-चटण्यांचे जार, पाण्याच्या बाटल्या अथवा पोळ्यांसाठी लागणारे सर्वसामान, तेल-मीठ यासारख्या लागणाऱ्या सर्व वस्तू ठेवू शकता.
लेझी सुजन तुम्ही फ्रीजमध्ये, डायनिंग टेबल, किचन प्लॅटफॉर्मवर असे कोठेही ठेवू शकता.
(9) ‘ओटा’ आवरा-आवर
बऱ्याच वेळा सगळ्या जणी सगळा स्वयंपाक पूर्ण झाल्यावर किचन प्लॅटफॉर्म आवरायला घेतात.
स्वयंपाक झाल्यावर किचन आवरणे हे अत्यंत कंटाळवाणे वाटते, त्यामुळे स्वयंपाक चालू असतानाच एकीकडे ओटा आवरायला सुरुवात करा.
(10) ग्लॅमरस कॉर्नर
संपूर्ण किचन खूप ग्लॅमरस लक्झुरिअस बनवणे शक्य नसेल तर; किचनमध्ये एखादा कॉर्नर, एखादे कपाट किंवा एखादी भिंत ग्लॅमरस बनवा!
यामुळे किचनमध्ये तुम्हाला प्रसन्न व उत्साही वाटेल आणि काम झटपट होईल.
Image Credit: Cozyhaventales
अशाप्रकारे या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे स्वयंपाक घर स्वच्छ व नीटनेटके ठेवू शकता.
वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाक घराची रचना कशी असावी हे जाणून घ्यायचे असेल तर आमचा दुसरा ब्लॉग ‘वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाक घर कसे असावे?’ जरूर वाचा.